छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : दिवाळी सणानिमित्त स्थायी समिती सभापती अनिल मकरिये यांनी सुरू केलेल्या पालावरच्या शाळेतील ६० गरीब विद्यार्थ्यांना मिठाईचे वाटप करण्यात आले.
मिठाई मिळाल्याने विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.
परराज्यातून रोजगाराच्या शोधात छत्रपती संभाजीनगरमध्ये आलेल्या कुटुंबांतील मुलांना शिक्षणापासून वंचित राहावे लागू
नये, या सामाजिक उद्देशाने या पालावरच्या शाळेची सुरुवात करण्यात आली आहे. बीड बायपास परिसरातील एम.आय. टी. कॉलेजजवळ, निशांत पार्क परिसरातील गरीब वस्तीमध्ये ही शाळा सुरू करण्यात आली आहे. या माध्यमातून आर्थिक व सामाजिक परिस्थितीमुळे शिक्षणापासून दूर राहणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. यावेळी नगरसेवक पदमसिंह राजपूत, किशोर मानकापे, तसेच विद्यार्थ्यांना विनामूल्य शिक्षण देणारे शिक्षक राघवेंद्र मेहता आणि त्यांचे सहकारी उपस्थित होते.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions














